अवैध दारूची वाहतूक ; बर्‍हाणपूरच्या युवकाला अटक

0

रावेर- निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्यानंतर निवडणूक प्रशासनाकडून पैसा, दारू, शस्त्रांची वाहतूक रोखण्यासाठी चोरवड येथील तपासणी नाक्यावर बसेसची तपासणी करताना दारूची अवैधरीत्या वाहतूक करणार्‍या बर्‍हाणपूरच्या युवकाला अटक करण्या आली. सोमवारी सकाळी ही कारवाई रण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून 12 हजार 600 रुपये किंमतीची दारू जप्त करण्यात आली.

बसमधून मद्याची वाहतूक उघड
सोमवारी सकाळी 7.30 वाजता निवडणुकीच्या अनुषंगाने बस व वाहनांची तपासणी पोलिस कॉन्स्टेबल मोसोरोद्दीन व नवाज तडवी करीत असताना चोरवड येथील तपासणी नाक्यावर बर्‍हाणपूर-धुळे बस (क्रमांक एम.एच. 40 एन.9039) ची तपासणी सुरू असताना बसमधील एका सीटवर 24 वर्षीय युवकाच्या पायाजवळ सीटखाली असलेल्या दोन काळ्या व एक चॉकलेटी रंगाच्या बॅगेत पाच हजार 400 रुपयांच्या ऑफिसर चॉईस व सात हजार 200 रुपये किंमतीची मॅकडोल कंपनीची दारू जप्त करण्यात आली. राहुल पटेल (इतवारागेट, बर्‍हाणपूर) यास अटक करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली विजू जावरे व निलेश चौधरी करीत आहेत.