अवैध दारूविक्री करणार्‍यांना पकडले

0

जुन्नर । बेकायदेशीर देशीरित्या दारू विक्रीचा व्यवसाय करणार्‍या दोघांना विठ्ठलवाडी (कुमशेत) येथे नागरिकांनी रंगेहात पकडून दिले. या दारू विक्रेत्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. यावेळी जुन्नर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ दिवटे यांनी संबंधीत आरोपीना ताब्यात घेऊन दारूचा माल जप्त केला. तब्बल 124 देशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या.

कुमशेत, बल्लाळवाडी, पांगरीमाथा, शिरोली परिसरात गेल्या अनेक महिन्यापासून अवैधरित्या देशी दारुू विक्रीचा व्यवसाय सुरू होता. या व्यवसायामुळे स्थानिक युवक मोठ्या प्रमाणावर नशेच्या आहारी गेले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थ व महिलांनी या अवैधरित्या दारूविक्री करणार्‍यांना पकडून चोप दीला. बेकायदेशीर देशी दारू विक्रीप्रकरणी प्रकाश किशोर साळवे (रा. शुक्रवार पेठ, जुन्नर) व संतोष बाळशीराम वारे (रा. विठ्ठलवाडी, जुन्नर) यांच्यावर जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ दिवटे याबाबत अधिक तपास करत आहेत.