अवैध दारू अड्ड्यांवर रामानंदनगर पोलिसांची धाड

0

जळगाव। रामानंदनगर पोलिसांच्या डिबी पथकाने आज गुरूवारी सकाळी हद्दीतील चार ठिकाणी अवैध गावठी दारू विक्रेत्यांच्या अड्ड्यावर धाड टाकत पाच जणांना अटक केली असून त्यांच्या कडून 3750 रुपयांची गावठी दारू जप्त केली आहे. दरम्यान, या पाच जणांविरूध्द रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने महामार्गालगच्या 500 मिटर आतील दारू विक्रीचे दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे महामार्गालगचे काही दुकाने बंद करण्यात आले आहे. त्यामुळे शहरात वेगवेगवळ्या ठिकाणी आता अवैध दारू विक्रेते फोफावत असल्याचे समोर येत आहे.

अशांच्या पथकाने केली कारवाई
त्या आधारावर उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे यांनी दिलेल्या आदेशावरून रामानंदनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रविण वाडीले यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय गोपाल चौधरी, प्रदिप चौधरी, हेकॉ. अरूण पाटील, अरूण निकुंभ, अतुल पवार अशांच्या पथकांनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हरिविठ्ठलनगर, खंडेरावनगर, पिंप्राळा, हुडको आदी ठिकाणी अवैध दारू विक्रेत्यांच्या अड्ड्यांवर छापा मारत 3750 रुपयांची गावठी दारू जप्त करीत अवैध दारू विकणार्‍या पाच जणांना अटक करून त्यांच्याविरूध्द रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

कारवाई अन् असा मुद्देमाल
पथकाने पिंप्राळ्यात धाड टाकून पोर्णिमा प्रल्हाद निकम यांना अटक करून 1500 रुपयांच्या टँगो पंचच्या 30 बाटल्या जप्त केल्या. तर हरिविठ्ठलनगरातून कोळीळा तुकाराम काळे या महिलेस ताब्यात घेत हिच्याकडून 500 रुपये किंमतीची 10 लिटर गावठी दारू तर खंडेरावनगरातून बेकुबाई झगडू भोई व कैलास मंगल बोरसे यांच्यावर कारवाई करून 1200 रुपये किमतीची 30 लिटर गावठी दारू जप्त केली.

यानंतर पिंप्राळ्यात बाळु सिताराम सपकाळे हा अवैध गावठी दारू विकतांना मिळून आला असून त्याच्याकडून 450 रुपये किमतीची 8 लिटर गावठी दारू मिळून आली असून ती दारू पोलिसांनी जप्त केली. दरम्यान, पथकाने या पाचही जणांना अटक करून 3750 रुपयांची गावठी दारू जप्त करून त्यांच्याविरूध्द रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.