धुळे । सुप्रीम कोर्टाने महामार्गालगतची तसेच 500 मिटर अंतरावरील परमीट रुम, वाईन शॉप, बियरबार आदी दारु दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे शहरातील मुख्य रस्त्यावरील सर्वच दारू दुकाने बंद झाली आहेत. परंतु, शहरात चौका चौकात अवैध दारू मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे. अवैध दारू विकत घेऊन मद्यपेयी शहरातील मुख्य रस्त्यांवर, कॉलनी परीसरातील ओपन स्पेसमध्ये सोडा गाडीवर, अंडाभूर्जी गाडी, शहरातील मध्यवर्ती ठिकाणी बंद असेलेले सरकारी रूग्णालय, पांझरा नदी काठावरील गणपती मंदिर ते शितलामाता मंदिर पर्यंत अशा अनेक ठिकाणी अवैध दारू विक्रीमुळे राज रोस दारू पितात अशा सार्वजनिक ठिकाणी दारू पिणार्यांवर कठोर कारवाई करून कायमस्वरूपी प्रतिबंध करण्याची मागणी लोकसंग्राम संघटनेद्वारे पोलीसांना अधिक्षकांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
तरूणी, महिलांची मद्यपी काढतात छेड
सुप्रीम कोर्टाच्या बंदी आदेशानंतर दिलेल्या सर्व परवानग्या रद्द करुन परिसरातील महिला, माता-भगिनी, महाविद्यालयीन तरुणी यांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास होणार आहे. तसेच दारु पिण्यास येणार्या मद्यपींमुळे या परिसरातील महाविद्यालयीन तरुण, तरुणी यांच्या भविष्यावरही विपरित परिणाम होणार आहे. याठिकाणी काही गुंड, टवाळखोर, टारगट मुले दिवसभर बसून असतात आणि महाविद्यालयीन तरुणी, महिलांची छेड काढतात. तरी वर नमूद सर्व परिसरात कुठल्याही प्रकारची परमिट रुम, बियरबार, वाईन शॉपी या दारु दुकानांना परवानगी देण्यात येवू नये. परवानगी दिली असेल ती ताबडतोब रद्द करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी तेजस गोटे, प्रशांत भदाणे, अमोल सुर्यवंशी, संजय बगदे, सचिन पोतेकर, अविनाश लोकरे, भोला गोसावी, वामन मोहिते, योगेश सोनवणे, सचिन सुर्यवंशी, बंटी अहिरे, बाळु शेंडगे, दिपक जाधव, नाना पाठक, संदिप सुतार, प्रविण राणा आदी उपस्थित होते.