अवैध धंद्यांविरुद्ध वॉश आऊट मोहिम
सावदा पोलिसांच्या कारवाईने खळबळ : पत्त्याचा डाव उधळला ; गावठी दारूही जप्त
सावदा : सावदा पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्या रायपूर तसेच लोहार या दोन ठिकाणी सावदा पोलिसांनी कार्यवाही करत एका ठिकाणी अवैध दारूची भट्टी उद्ध्वस्त केली तर एका ठिकाणी जुगार खेळणार्या तीन जणांना अटक केली. या कारवाईने मोठी खळबळ उडाली. सावदा येथून जवळ असलेल्या रायपूर येथे दिलीप धोंडू कोळी हा इसम आपल्या घरामागे तापी नदी पात्रा लगत अवैध दारू गाळत असल्याची माहिती मिळल्यावरून सावदा पोलिसांनी कारवाई अवैध दारू भट्टी उद्ध्वस्त करीत संशयीतास अटक केली व कच्चे-पक्के रयासन दारूचे रसासन व साहित्य मिळून सुमारे 37 हजार रुपयांचे साहित्य नष्ट केले. दुसर्या कारवाईत लोहारा बीटमध्ये लोहारा गावी कुसुंबा रस्त्यावर दर्ग्याच्या मागे मोकळ्या जागी काही जण झन्ना-मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळल्यावरून याठिकाणी धाड टाकली असता 8 ते 10 जण पळाले मात्र तौफिक शेख मोहमद (30, रावेर), राजेंद्र रोहिदास वाघ (32, उतखेडा) व मनोज जयराम महाजन (40, निंबोल) या तीन जणांना ताब्यात घेण्यात.
एक लाख 58 हजारांचा मुद्देमाल जप्त
संशयीतांकडून तीन हजार 370 रुपये रोख तसेच डावात तीन हजार रुपये रोख व पळून गेलेल्यांकडील पाच मोटारसायकल मिळून सुमारे एक लाख 21 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोघा कारवाईत एकूण एक लाख 58 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई सहा.पोलिस निरीक्षक देविदास इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजेंद्र पवार, हवालदार पांडुरंग सपकाळे, संजय चौधरी, सुनील कुरकुरे, मोहसीन खान, युसूफ तडवी आदींच्या पथकाने केली.