धरणगाव। येथील शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैधधंदे दिवसा ढवळ्या सुरु आहेत. सट्टा, पत्ता, दारू, गुटखा दिवसाढवळ्या सर्रास विक्री सुरु आहे याबाबत भारतीय जनता पार्टीतर्फे धरणगाव पोलिस निरीक्षक व पोलिस अधिक्षक यांना यापूर्वी निवेदन देवून कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु निवेदन देवून देखील अवैध धंदे बंद न झाल्याने गुरूवार 27 जुलै 2017 रोजी भाजपतर्फे घंटानाद आंदोलन करण्यात आले. जळगाव जिल्हा उपाध्यक्ष पी.सी.आबा पाटील, सुभाष पाटील, तालुकाध्यक्ष संजय महाजन यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
शहरासह तालुक्यात अवैध धंद्यांची रेलचेल
धरणगाव शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे दिवसा ढवळ्या सुरु आहेत. शहरात ठीक ठिकाणी पडदे लावून आकडे घेतले जातात. अंतरा-अंतरावर सरसकट सट्ट्याचा बाजार सुरु आहे. पत्त्यांचे क्लब ठिकठिकाणी सुरु आहेत. दारूबंदी असतांना देखील अवैध प्रकारे दारू विक्री केली जात आहे. निकृष्ट दर्जाची केमिकलचा वापर करून बनविलेली देशी व विदेशी दारू ठीक ठिकाणी विकली जात आहे. गुटखाबंदी असतांना सर्रास गुटखा विक्री सुरु आहे. गुटख्याचे ट्रकच्या ट्रक तालुक्यात रिकामे होत असल्याची माहिती उपस्थितांकडून देण्यात आल्याचे दिसून येत आहे.
अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
जिल्हा उपाध्यक्ष पी.सी.पाटील यांनी म्हटले कि, शहरासह तालुक्यातील सट्टा, पत्ता, अवैध दारू विक्रीसह सर्व अवैध धंदे तात्काळ बंद करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीतर्फे करण्यात आलेली आहे. या सर्व धंद्यांमुळे नागरिकांचे संसार उध्वस्थ होत असून गावातील शांतता धोक्यात येवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो. या आंदोलनाची दखल पोलिस प्रशासनाने न घेतल्यास या पुढे आंदोलन तीव्र करण्यात येईल. जळगाव ग्रामीण मतदार संघाचे शिवसेनेचे नामदार सहकार मंत्री गुलाबराव पाटील यांच्या आशीर्वादानेच हे धंदे सुरु असल्याचा आरोप यावेळी भाजप तालुका अध्यक्ष संजय महाजन यांनी केला.
आंदोलनात यांचा होता सहभाग
जिल्हा उपाध्यक्ष पी.सी.पाटील, सुभाष पाटील, शिरीष बयस, तालुकाध्यक्ष संजय महाजन, अमळेनर कृउबा पावबा पाटील, गुलाबबाबा पाटील, राजेंद्र पाटील, नाना बळीराम, शेखर पाटील, पुनिलाल महाजन, सुनील वाणी, कैलास माळी, आर.डी.महाजन, निर्दोष पाटील, राकेश नन्नवरे, सुनील चौधरी, भालचंद्र माळी, ललित येवले, कडूसिंह बयस, गुलाब मराठे, शरद कंखरे, मधुकर रोकडे, अॅड.शरद माळी, सचिन पाटील, नाना महाराज, कन्हैया रायपुरकर, दिलीप महाजन, टोनी महाजन, जितेंद्र महाजन, पापा वाघरे, कांतीलाल महाजन, विशाल महाजन, ज्ञानेश्वर माळी, संजय कोठारी, सुदाम मराठे, राजेंद्र महाजन, वासुदेव महाजन, मधुकर पाटील, भूषण कंखरे, मणिलाल महाजन, आबा पाटील, डोंगर चौधरी, अनिल महाजन, प्रकाश सोनावणे, योगेश ठाकरे, भीमराज पाटील, शालिक आप्पा, मंगल पाटील, प्रवीण पाटील, छोटू पाटील, अशोक पाटील, जगन्नाथ भाऊ, सुनील सर, नंदू नाना, नाना मिस्तरी, सदाशिव भाऊ, प्रशांत अत्तरदे, शिवदास पवार, भिकनशहा पटेल, परेश पाटील, राजू भाऊ, शिवदास पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.