अवैध धंद्याच्या विळख्यात थाळनेर बस स्थानक

0

थाळनेर। थाळनेर गावातील बसस्थानक परिसरात अवैधे धंद्याचा मोठा व्यवसाय चालवला जात आहे. या ठिकाणी दारू ,गांजा ,मटका ,पत्याचा क्लब व अन्य धंदे चालत असून याचा सामना महिला व प्रवाशांना करावा लागत आहे. थाळनेर बसस्थानकावर अवैध धंदे दिवसेंदिवस वाढत चालले असून भीतीने प्रवाशी बसस्थानकावर येण्या ऐवजी स्वामी समर्थ स्टॉप वरून प्रवास करत आहेत..

गावात पोलीस स्टेशन असून देखील या प्रकाराला आळा घातला जात नसल्याने रोष व्यक्त केला जात आहे. उलट पोलिसांचे या धंद्यांना सहकार्य असल्याचे देखील नागरिक सांगत आहेत. यामुळे नागरिकांनी नवीन पोलीस आधिकार्‍याची मागणी केली आहे. गावात दामसर पाडा, वडारवाडी, नवलपूरा, भिलाटी, खंडेराव पाडा, नावाडी पाडा या भागात अवैध धद्यांचा उत आला आहे. वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करत आहेत.