अवैध धंद्यावर छापा

0

खेड शिवापूर । शिवापूर येथील वेताळ वस्ती जवळ असणार्‍या अवैधरित्या गावठी दारु विकणार्‍या अड्ड्यावर खेड-शिवापूर पोलिसांनी छापा टाकून माल हस्तगत केला. मात्र, दारूविक्रेता पळून गेला.

मंगळवारी पोलिसांना एक जण गावठी दारू विकत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक समीर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संतोष तोडकर आणि विकास कांबळे यांनी तेथे छापा टाकला. यात पोलिसांनी 50 लिटर 36,00 रुपये किंमतीची दारू हस्तगत केली. पोलिसांची चाहूल लागताच दारुविक्रेता सूरज ऊर्फ गोट्या दिलीप चव्हाण पळून गेला. या प्रकरणी पोलिसांनी सूरजवर गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास उपनिरीक्षक समीर कदम आणि त्यांचे सहकारी करीत आहेत.