शहादा । शहादा खेतिया मध्यप्रदेश येथील बेकायदेशीररित्या उधना’ जिल्हा सुरत गुजरात राज्यात मद्याची वाहतूक करणार्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने रंगेहाथ पकडले असून त्यांच्या ताफ्यातून 3 लाख रूपये किंमतीच्या स्वीप्ट डिजायर सह 66500 किमंतीचा विदेशी मद्य असा सुमारे 3 लाख 65500 रू कंमतीचा मुदेमाल ताब्यात घेतला आहे.
शनिवारी वरूण कैलास जनार्दन कोळी वय 23 रा उधना व विराज राजु खंडारे वय 21 रा उधना रा सुरत गुजरात या दोघांना अटक केली. दोघा आरोपींना न्यायालयाने 16 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे निरीक्षक गिरीष पाटील, हवलदार विलास अनगे, भटू धनगर यांच्या पथकांने सापळा रचून कारवाई केली. या बाबत शहादा पोलिसात हवालदार विकास अजंगे यांच्या फिर्यादी असुन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 16 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.