अवैध लाकुड वाहतूक करणार्‍या वाहनावर कारवाई

0

17 लाख 89 हजारांचा ऐवज जपत

नवापुर । नवापुर तालुक्यात गुरुवारी 7 रोजी पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपुत यांना अवैध लाकुड वाहतुक होत असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनूसार त्यांनी वाहने थांबवून तपासणी केली असता त्यांना लाकुड भरलेला ट्रक दिसून आला. याबाबत वाहन चालक अफताब सज्जु महम्मद (डेहराडुन) वाहक मोहम्मत उस्मान मोहम्मद नसिर (डेहराडुन) यांना विचारपुस केली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली. लाकुड मालाचे व वाहनाचे कोणतेही कागदपत्र सादर न केल्याने लाकुड चोरीचा असल्याचा संशय बळावल्याने चालकासह वाहकाला ताब्यात घेवून पोलीस स्टेशनला आणले. वनविभागाच्या मदतीने लाकडांचा मोजमाप करण्यात आले. खैर जातीचे लाकुडासहीत 17 लाख 89 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.

एकदिवसीय पोलिस कोठडी
पुढील तपास पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपुत यांचा मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिपक पाटील, दिलीप चौरे, योगेश थोरात, निजाम पाडवी आदी करीत आहे. लाकुड सह ट्रक वनविभागाचा कार्यवाहीसाठी ताब्यात देण्यात आले.माल हा वनविभागाचा शासकीय विक्री आगार नवापुर येथे जमा करण्यात आला आहे. पुढील कार्यवाही वनक्षेत्रपाल आर.बी.पवार, वनपाल प्रकाश मावची, वनपाल एस.एल.कासार, के.व्ही.वळवी, वनरक्षक बी.बी.गायकवाड, एस.बी.गायकवाड, के.एन.वसावे, एस.डी.बडगुजर, अमोल काशीदे, नितीन खंडारे, रामदास पावरा, एस.पी.पदमर, आर.एस.कासे, एन.एस.पीपळे, साहेबराव तुगांर, एस.खैरनार आदी करीत आहे. आरोपींना एकदिवसीय पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.