अवैध लाकुड वाहतूक, तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

0

धुळे । तालुक्यातील सारंगखेडा मार्ग अवैध जळाऊ व इतर लाकुड घेऊन जाणारा असल्याची गुप्त बातमीचा आधारावर शहादा जयनगर वनविभागाने पहाटे सापळा रचत सुमारे तीन लाख दहा हजार 700 रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. तालुक्यातील कळंबु येथुन जळाऊ व लिब जातीचे लाकुड विना परवाना अवैध मार्ग जाणार असल्याची माहिती शहादा वनविभाग सहाय्यक वन संरक्षक पी पी सुर्यवशी यांना मिळाली होती.

त्यांनी त्वरित शहादा वनक्षेत्रपाल ए. जे पवार, वनपाल आर पी रोहिकर यांच्यासह बंदोबस्त लावला होता. या घटनेची या घटनेची चाहुल अवैध लाकूड वाहतूक करणार्‍यांस लागल्यामुळे त्यांनी दिवस राञभर वाहण जागेवरून हलविले नाही. गुरूवारी पहाटे तीन ते चार वाजेच्या सुमारास कोणी नसणार या महत्वकांक्षेत ट्रक चालकाने तेथुन ट्रक हलविला होता. पहाटे चार वाजेच्या सुमारास ट्रक क्रमांक एम.एच. 41 जी. 6322 हा सारंगखेडा कंळबु रस्त्याच्या चौफुलीवर येताच राञभर गस्तवर असलेले वनविभागाचे अधिकारी वनरक्षक यांनी ट्रकला अडविले. त्यात चालक यांस ताब्यात घेत ट्रंक शहादा वनविभाग कार्यलयात जमा केला आहे.