शहादा । येथील दोंडाईचा रस्त्यावरील राजा पॅलेस जवळ अवैधरित्या वाळु वहातुक करणारा ट्र्क सामाजिक कार्यकर्त्यांने पकडुन महसुल विभागाचा ताब्यात दिला. या ट्र्कमध्ये 135 रुपये किंमतीची एक अशी एकुण 700 बॅगा सुमारे दोन लाखांचा वाळु व 27 लाखांचा ट्र्क जप्त करण्यात आला आहे . यामुळे वाळु माफीयांचे धाबे दणाणले असून अधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यावर दबाव टाकण्याचा दिवसभर नाट्यमय प्रकार घडला. एप्रिल पासून ते आतापर्यंत 60 वाहनावर दंडात्मक कार्यवाही करुन सुमारे 12 लाखांचा महसुल वसुल केला आहे. अवैधरित्या गौण खनिज उपसा करणार्याची व वाहतुक करणार्यांवर नजर ठेवुन कार्यवाही केली जात आहे. कोणाच्या दबावाला बळी पडणार नाही असे प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांनी सांगितले.
दोन लाखांची अवैध वाळू
महसुल विभागाच्या कर्मचार्यांची तपासणी केली असता या ट्र्कमध्ये बाजार भावाप्रमाणे प्रती बॅग 135 रुपये प्रमाणे सुमारे दोन लाखाचा अवैध वाळु मिळुनआल्याने मंडळ अधिकारी शिरीष परदेशी व तलाठी एन. एन. डिगराळे यांनी पंचनामा केला. यानंतर ट्रक व वाळू जप्त करण्यात आली. या ट्रकची किंमत 27 लाख रुपये असून सुमारे 2 लाखांची वाळु गोण्यामध्ये भरुन ताडपत्रीने अच्छादित करुन पॅक केली होती. याकारवाईने वाळुमाफियात घबराहट निर्माण झाली आहे. राज्यात सर्वत्र वाळुबंदी असतांना अवैधरित्या वहातुक करणार्या वाहनांवर कार्यवाही करण्यासाठी एक स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात आले आहे.
तहसीलदारांना दिली खबर
याबाबत अधिक माहिती अशी की शहादा दोंडाईचा रस्त्यावरील राजा पॅलेस जवळ एम. एच.18 बी. ए. 0274 या ट्र्कमध्ये सुमारे 700 गोण्या वाळुने भरलेला होता ट्र्क पूर्णपणे ताडपत्रीने अछादलेला होता. सामाजिक कार्यकर्ते राजमल व सलाउद्दीन यांनी चालक शे. समशोद्दीन शे. सरफोद्दीन रा. हजार गल्ली धुळे यांना ट्रकबाबत विचारणा केली. यावेळी ट्रकचालकाने त्यांना उडवा उडवीचे उत्तर दिली. या कार्यकत्यार्ंनी महसुल प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर व तहसीलदार मनोज खैरनार यांना भ्रमणध्वनीने माहिती दिली असता या घटनेची दखल घेत महसुल विभागाच्या अधिकार्यांनी घटनास्थळी पहाणी केली.