रावेर। तालुक्यातील दोधे येथील तापी नदीपात्रात अवैधरित्य वाळु उपसा करणार्या ट्रॅक्टरवर अटवाळा येथील तलाठी जगताप यांनी 17 रोजी पकडून दंड करुन कारवाईसाठी प्रांताधिकार्यांकडे प्रस्ताव पाठविला. लगेच 23 रोजी सुध्दा पकडलेल्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात आली परंतु दंड करुन प्रांतांकडे पाठवणे अपेक्षित असतांना सोडून दिल्याच्या आक्षेपावरुन रिपाइंतर्फे तहसिलदारांना निवेदन देण्यात आले आहे.
मार्च अखेर सुरु असल्याने अवैधरित्या वाळू उपसावर कठोर दंड करुन तात्काळ कारवाईची धडक मोहीम सुरु आहे परंतु काही हितसंबंधामुळे पकडलेल्या ट्रॅक्टरवर दंड करून लगेच सोडण्यात येते. तरी काही ट्रॅक्टरवर दंड वसूल करुन कारवाईसाठी प्रांताधिकार्यांकडे पाठवण्यात येत आहे. तरी महसूल प्रशासनाकडून सुरु असलेला दुजाभाव थांबवावी, अशी मागणी रिपाइंतर्फे करण्यात आली आहे.