महसूल कर्मचार्यांना माहिती होऊ न देता राबविली मोहिम; 17 ट्रॅक्टरसह 9 दुचाकी केल्या जप्त
जळगाव– कुठल्याही वाळू ठेक्याचा लीलाव झालेला नसतांना सर्रासपणे वाळूची चोरी वाहतूक सुरु आहे. कुठलीही कारवाई होत नसल्याने वाळूमाफियांचीही हिंमत वाढली होती. सोमवारी नाशिकला जात असतांना जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांना वाहनातून बांभोरी पूलावरुन नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टर वाळूचा उपसा करत दिसले. त्यांनी तत्काळ याबाबत पोलीस अधीक्षक पदाचा पदभार असलेल्या अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांना कारवाईच्या सुचना केल्या. त्यानुसार नवटके यांनी आपल्या तसेच पोलीस उपधीक्षक यांच्या ताफ्यासह सावखेडा शिवारातील गिरणानदीपात्र गाठले. याठिकाणी धडक कारवाई करुन 12 ट्रॅक्टर व वाळूमाफियांच्या 9 दुचाकी जप्त केल्या आहे. विशेष म्हणजे या कारवाईबाबत महसूलच्या कुठल्याच कर्मचार्याला खबर न करता कारवाइसाठी पोलीस पथकाडून विशेष दक्षता घेण्यात आली हाती. जप्त करण्यात आलेले सर्व ट्रॅक्टरसह ट्रॉल्या विनानंबरच्या तर 9 पैकी एकच दुचाकीवर नंबर असल्याची माहिती समोर आली आहे. स्वतः डोळ्यांनी बघितल्यावर अवैध वाळू वाहतुकीवर जिल्हाधिकारी यांना कारवाईसाठी जाग आल्याची चर्चा आहे. पोलिसांच्या कारवाईनंतर महसूल तसेच एमआयडीसी पोलिसांनी एकत्रित कारवाई करुन 5 ट्रॅक्टर जमा करुन पोलीस ठाण्यात आणले होते. धडक कारवाईने वाळूमाफियांमध्ये खळबळ उडाली आहे.
वेगवेगळ्या गावांमधून तीन पथकांचा सापळा
जिल्हाधिकार्यांच्या सुचनेनुसार अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी तत्काळ पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांना बोलावून घेतले. यानंतर डॉ. रोहन यांच्यासह साध्या वेशातील कर्मचार्यांनी तीन पथके तयार करण्यात आली. यात भाग्यश्री नवटके यांचे पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय काळे, पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र मोतीराया, नितीन पाटील, नरेंद्र पाटील यांचे एक पथक, दुसर्या पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांचे सहाय्यक विनयकुमार देसले, पोलीस हेडकॉन्स्टेबल किरण धमके, पोलीस कॉन्स्टेबल अशोक फुसे, तुषार जोशी तर तिसरे अपर पोलीस अधीक्षक यांचे वाचक सहाय्यक पोलीस निरिक्षक जयेश खलाणे, विजय सोनवणे, अजय पाटील, चेतन निकम अशी पथके होती. सावखेडा गावातून एक तर दुसरे धानारो तर तिसर्या पथकाने मोहाडी गावातून शिरले. तीनही वेगवेगळ्या ठिकाणांहून पथकाने वाळूमाफियांना वेधले.
पथकातील कर्मचारीही कारवाईबाबत अनभिज्ञ
या कारवाईबाबत अधिकार्यांनी दक्षता पाळली होती. पथकातील कर्मचार्यांला कुठलीही माहिती दिली नव्हती. तसेच सर्वांचे मोबाईल स्विचऑफ करण्यात आले होते. दुसरीकडे महसूल कर्मचार्यांनाही कुठलीही खबर देण्यात आली होती. पथकाने एकत्रित कारवाई करुन 12 ट्रॅक्टर ट्रालीसह तर पळालेल्या कामगारांच्या 9 दुचाकी जप्त केल्या. या कारवाईनंतर महसूल विभागाच्या कर्मचार्यांवर घटनास्थळावर बोलाविण्यात आले. त्यांची पंचनामा केला यानंतर संबंधित सर्व वाहने शहर वाहतूक शाखेत जमा करण्यात आली.
पथक दिसताच वाळू उपसा करणारे पसार
पथकाला पाहताच वाळू ट्रॅक्टर मध्ये भरत असलेले कामगार तसेच चालक घटनास्थळाहून पसार झाले. अचानकच्या कारवाई कुठलीही तयारी नसलेल्या पथकातील कर्मचार्यासोबत अनुचित प्रकार घडू नये म्हणून कामगारांचा पाठलागही करण्यात आला नाही, तसेच त्यांना ताब्यातही घेण्यात आले नाही. विशेष म्हणजे याठिकाणी 4 ट्रॅक्टर हे पथकासमोर पसार झाले.
अन् महसूल, एमआयडीसी पोलीसांना जाग
अपर पोलीस अधीक्षक यांच्या कारवाईनंतर एमआयडीसी पोलीस तसेच महसूल विभागाला जाग आली. महसूल निमखेडी शिवारातून पाच ट्रॅक्टरवर कारवाई केली. यात काही ट्रॅक्टर हे एमआयडीसी पोलिसांना मोहाडी येथून जप्त केली. पोलिसांनी जप्त केलेले ट्रॅक्टर रिकामे असल्याची माहिती मिळाली असून केवळ कारवाईचा दिखाव्यासाठी तसेच वरिष्ठ अधिकार्यांच्या भितीने पोलिसांनी ट्रॅक्टर घेतल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
दोन दिवसांपूर्वी पकडलेले एक पोलिसाचे ट्रॅक्टर
नशिराबाद येथील शेतकर्याला मारहाणीदरम्यान आम्ही पोलिसांना हप्ते देतो, असे उल्लेख करुन बेदम मारहाण केली होती. त्यामुळे पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध वाळूची वाहतूक होत असल्याचे समोर आले होते. दरम्यान दोन दिवसांपूर्वी तहसीलदारांच्या पथकाने नागझिरी शिवारातून कारवाई करुन ट्रॅक्टर जप्त केले होते. हे ट्रॅक्टर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात कार्यरत एका पोलीस कर्मचार्याचे असल्याची माहिती आहे. या कर्मचार्याने ट्रॅक्टर सोडून द्यावे म्हणून तसेच प्रकार समोर येवू नये म्हणून हसीलदारांच्या विनवण्या केल्याचेही वृत्त आहे. दरम्यान अवैध वाळू उपसा करण्यार्या वाळूमाफियांमध्ये पोलीस कर्मचार्यांचा सहभाग असल्याच्या गंभीर बाबींवर यामुळै शिक्कामोर्तब झाला आहे. आता पोलीस विभाग अशा कर्मचार्यांवर काय कारवाई करते,