अवैध वाळू वाहतुक करणारे तीन डंपर पकडले

0

तहसीलदार वैशाली हिंगे यांची धडक कारवाई

जळगाव – येथील तहसिलदार वैशाली हिंगे यांनी आज सकाळी ८ असोदा -शिवाजीनगर रस्त्यावर अवैधरित्या वाळू वाहतूक करणार्‍या तीन डंपर पकडून त्यांच्यावर धडक कारवाई केली आहे.
जळगाव शहरातुन काही ठिकाणाहून वाळूची अवैधरित्या वाहतुक केली जात आहे. आज याबाबत तहसिलदार हिंगे यांना माहिती मिळाली की, असोदा शिवाजीनगर रस्त्यावर तीन डंपर वाळूची अवैधरित्या वाहतूक करून ती वाळू शहरात आणली जात आहे. त्यानूसार तहसिलदार हिंगे यांनी जिल्हा गौण खनिज अधिकारी दीपक चव्हाण, तलाठी, पोलिसांना सोबत घेवून या त्याठिकाणी आल्या. काही वेळातच त्यांना डंपर वाळूने भरलेले येताना दिसले. त्यांना अडवून पावत्यांची विचारणा केली असता वाहनचालकाने पावत्या नसल्याचे सांगितले. त्यावरून अवैध वाळू वाहतूकीचा पंचनामा करून तिघे वाहने जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आली. एम. एच. १९ सीवाय १११३, एम एच १९ सीवाय १११४ ही दोन डंपर व एका डंपरच्या क्रमांकावर ग्रीस लावले होते. प्रत्येक डंपर चालकाकडून सुमारे अडीच लाखांचा दंड वसूल होणार आहे.