अवैध वाळू वाहतूकदारांचे दणाणले धाबे : तीन ट्रॅक्टर जप्त

0

मुक्ताईनगर : तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या भोटा-रीगाव-कुर्‍हा रस्त्यावर नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू तस्करी करणारे तीन ट्रॅक्टर पकडण्यात आल्याने अवैधरीत्या वाळू वाहतूक करणार्‍यांच्या गोटात खळबळ उडाली आहे. मुक्ताईनगरच्या तहसीलदार श्वेता संचिती यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईने अवैध वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे. ही कारवाई संतोष गायकवाड, निलेश काळे, जयेश सुरवाडे, गजानन सोनवणे, सोमनाथ गोररकाळ यांच्या पथकाने केली.