भडगाव । एप्रिल महीण्यात तालुक्यातील ग्रामीण भागातील अवैध रित्या वाळू वाहतुक करणारे 12 वाहनधारकांना 3,89,800 रुपये दंडात्मक कार्यवाही करुन महसुल वसुल करण्यात आला. त्यात पिंपळगाव 2,पिंपरखेड 1,गिरड 4,पाचोरा 1,वाक 1,बांबरुड 2,निंभोरा 1 असे 12 वाहनधारकावर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली आहे. परंतु या दंडात्मक कार्यवाहीवरुन महसुल विभागाची शहरावर वरदहस्त, ग्रामीण भागातच कार्यवाही ही दुटप्पी भुमिकावर प्रश्न निर्माण होत आहे.
वाळू वाहतुक करुन गिरणेचे वस्त्र हरण
शहरासह तालुक्यात नगरपरिषद, ग्रामपंचायत व इतर शासकीय विकास कामे सुरु आहेत. शासकीय काम दाखवून इतर खाजगी कामावर अवैध वाळू वाहतुक केली जात असल्याचे समजते. महसुल प्रशासनाला न जुमानता शहरातील व तालुक्यातील काही अवैध वाळु वाहतूकदार पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने गिरणा नदीतुन अवैध रित्या रात्री व दिवसा वाळू वाहतुक करुन गिरणेचे एक प्रकारे हे वस्र हरण करीत असल्याची चर्चा होत आहे. अवैध वाळु वाहतूकदार हे काही पोलिस कर्मचारी सोबत नेहमीच दिसुन येतात यांच्या माध्यमातून महसुल विभागाशी चेरीमेरी केली जात असल्याची देखील चर्चा शहरात होत असुन अनेक प्रश्न उपस्थितीत केले जात आहे.