अवैध वाळू वाहतूकीचे तीन वाहने जप्त

0

रावेर । भोकर नदीतुन विनापरवाना अवैध गाळ वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर टाली महसूल विभाने जप्त केल्याची घटना आज घडली. याबाबत वृत्त असे की, भोकर नदीतुन विनापरवाना अवैधरित्य तीन ट्रॅक्टर टाली गाळ वाहतूक करत असतांना तहसीलदार विजयकुमार ढगे यांच्या मार्गदर्शना खाली केर्‍हाळा येथील तलाठी के.आर.पाटील यांनी पकडून त्यांच्यावर प्रत्येकी 3 हजार 160 रुपये दंड करण्यात आला आहे.