भडगाव । शहरात शासकीय कामावर वाळू टाकण्याच्या नावाखाली अवैधरित्या खाजगी कामावर वाळु सर्रास पणे सुरु होती. दैनिक जनशक्तिने बातमीत उल्लेख केल्याने महसुल प्रशासनाने खळबळु जागे झाले. कराब शिवारातील गिरणा नदी पात्रातून प्रविण सुभाष वाघ व सुनिल शिवाजी गंजे याचे दोन ट्रक्टर पकडून कार्यवाही केली. क्षमते पेक्षा जास्त डंपरने वाळु वाहतुक होत असतांना तलाठींनी पकडले होते. त्याच बातमीत शहरातील अवैध वाळुचा वाहतुकीचा उल्लेख केल्यावर तलाठी पथकाने शहरातील अवैध रित्या वाळु वाहतुकीवर कार्यवाही करण्यात आली. आर.डी.पाटील, सुनिल मांडोळे, योगेश ब्राम्हणे, विजु नाईक या तलाठी पथकाने कार्यवाही केली.