अवैध वाळू वाहतूक ; आठ वाहनांवर कारवाई

0
मुक्ताईनगर :  अवैधरीत्या गौण खनिजाची वाहतूक करणार्‍या आठ वाहनांवर तहसीलदार रचना पवार-पाटील यांच्या विशेष पथकाने कारवाइृ केली. सोमवारी तहसीलदारांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन  महसूल नायब तहसीलदार निखील सोनवणे, तलाठी एम.के.खंडारे, डी.डी.ढेकणे, ए.एस.सरोदे, एम.पी0.ाणे या महसुल पथकाने सोमवारी रात्री तालुक्यातील पुरनाड फाट्याजवळ पाळत ठेवत अंतुर्लीकडुन येणारे आठ अवैधरीत्या वाहतूक करणारे आठ वाळूचे ट्रॅक्टर जप्त केली. आठ पैकी चार ट्रॅक्टर मालकांनी प्रत्येकी 13 हजार 500 प्रमाणे दंड भरला उर्वरीत चौघे ट्रॅक्टर मालक तहसीलमध्ये आले नाहीत, असे सूत्रांनी सांगितले.