यावल : यावल महसुलच्या पथकाने मंगळवारी अवैध वाळुची वाहतूक करणारा डापर जप्त करीत तो पोलिस ठाण्यात जमा केला आहे. मंगळवार, 22 मार्च रोजी दुपारच्या सुमारास शेळगाव मार्गाने यावल शहराकडे विनापरवाना अवैध गौण खनिज डंपरमधून नेले जात असताना महसुलचे प्रभारी तहसीलदार आर.डी.पाटील, निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यावल विभागाचे मंडळाधिकारी शेखर तडवी, यावल शहर तलाठी ईश्वर कोळी, शिपाई रामा कोळी यांच्या पथकाने डंपर जप्त केला. विक्रम नामदेव सोनवणे (जळगाव) यांचे डंपर (क्रमांक एम.एच.19 झेड.5888) असल्याचे सांगण्यात आले तर डंपरवरील वाहन चालक पंढरी बाबुलाल कोळी (जळगाव) यास महसुलच्या पथकाने थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्या डंपर चालकाने पळुन जाण्याचा देखील प्रयत्न केला. महसुलच्या वाहन चालकाच्या मदतीने पाठलाग करून डंपर पकडले.