जळगाव। जिल्हा प्रशासन तसेच महसूल विभागाकडून अवैध्य रेती वाळू उपसा व वाळू वाहतुक करणार्यांवर कारवाईचे धाडसत्र सुरू केलेले आहे. त्यानुसार गुरुवारी पिंप्राळा हुडको येथून अवैध्य वाळू वाहुतक करणारे ट्रॅक्टर तलाठीकडून पकडण्यात आले. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात आज गुन्हाची नोंद करण्यात येवून ट्रॅक्टर पोलिस ठाण्यात जमा केलेले आहे. जिल्ह्यातील विविध नद्यांच्या पत्रातून अवैध्य वाळू उपसा मोठ्या प्रमाणात सुरू आह
विना परवाना वाळू वाहतूक
जिल्हा प्रशासनाकडून कारवाईचे सत्र सुरू अनेक रेतीचे डंपर व टॅक्टरवर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नदी पात्रातून अवैध्यरित्या वाळू ट्रॅक्टरमध्ये भरून पिंप्राळा हुडकोमार्गे विक्रीसाठी गुरुवारी एक ट्रॅक्टर जात होते. दुपारी बारा वाजच्या सुमारास आव्हाण्याचे तलाठी मनोहर शिवराम बाविस्कर यांनी हे ट्रॅक्टर अडवून ड्रायव्हरकडे पावत्यांची मागणी केली. परंतू ड्रायव्हरकडे आवश्यक पावत्या नसल्याने रामानंदनगर पोलिस ठाण्यात तलाठी मनोज बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून आज नितीन किसन कुंभार (रा. पिंप्राळा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास संभाजी पाटील करीत आहे.