रावेर : रावेर परीसरात अवैधरीत्या वाळू वाहतुकीला ऊत आला असून रात्री सात ते सकाळी सात दरम्यान नदीतील वाळू उत्खननाचे सर्व नियम धाब्यावर बसवून मोठ्या प्रमाणात अवैध वाळूची वाहतूक सुरूच असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. स्थानिक महसूल प्रशासनाकडून अवैध वाळूच्या ट्रॅक्टरवर अपवादात्मक कारवाई होत असल्याने अवैध वाळू वाहतूकदारांचे फावले आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी या गंभीर प्रकाराकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
अवैध वाळू वाहतुकीला आला ऊत
वाळू घाटाचे लिलाव प्रलंबित असल्याने वाळूच्या वाहतुकीवर बंदी आहे परंतु रात्री सात ते सकाळी सातच्या दरम्यान पातोंडी भोकर नदी, केर्हाळा पिंप्री व खिरवड, पाल येथून अवैध मार्गाने वाळूची अवैधरीत्या वाहतूक सुरू आहे. याकडे स्थानिक तलाठी मंडळ अधिकारी व कोतवाल यांचे दुर्लक्ष होत असल्याने तहसीलदार, जिल्हाधिकारी प्रशासनाने दखल घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.