अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर, ट्रॅक्टर पकडले

0

जळगाव। तालुक्यातील फुकणी-नंदगाव रस्त्यावर 30 मेच्या रात्री विना परवाना चोरटी वाळ वाहतुक करतांना आव्हाने येथील तलाठी मनोहर बाविस्कर यांनी डंपर आणि ट्रॅक्टर पकडले. त्यात डंपरमध्ये चोरीची 1 ब्रास तर ट्रॅक्टरमधून 2 ब्रास वाळुन मिळून आली. याप्रकरणी तलाठ्याच्या फिर्यादीवरून दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, तलाठी मनोहर बाविस्कर यांनी गेल्या आठवड्या भरात केलेल्या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणून गेले आहे.

4 हजार रुपये किंमतीची वाळु जप्त
फुकणी-नंदगाव रस्त्यावर 30 मेच्या रात्री दिनकर साहेबराव सोनवणे (रा. नंदगाव) व रामचंद्र वामन साळुंके (रा. कोळनाव्ही) हे दोघे डंपर क्र. एमएच-19-झेड-3616 यामधून 1 ब्रास 2 हजाराची वाळू व डंपर तर विनाक्रमांकाचे ट्रॅक्टर यातून 2 ब्रास समारे 4 हजार रुपये किमतीची वाळू वाहतुक करीत असतांना आव्हाने येथील तलाठी मनोहर शिवरामा बाविस्कार यांनी त्यांना अडविले. यानंतर त्यांना परवाना विचारला असता त्यांनी उडवा-उडविचे उत्तर देत अखेर परवाना नसल्याचे सांगताच तलाठी बाविस्कर यांनी त्यांच्यावर कारवाई करत त्यांना तालुका पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी डंपर, ट्रॅक्टरसह 4 हजार रुपयांची वाळु जप्त केली असून दिनकर साहेबराव सोनवणे व रामचंद्र वामन साळुंके यांच्याविरूध्द तलाठी बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोहेकॉ. ईश्वर लोखंडे करीत आहेत.