अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पकडले

0

जळगाव । जिल्हा प्रशासनातर्फे अवैध गौण खनिज विरुद्ध मोहिम सुरू केली असून या मोहिम अंतर्गत आज तालुक्यातील वावडदा येथे अवैध्य वाळू वाहतुक करणारे डंपर तलाठी यांनी पकडले. ही घटना सकाळी दहाच्या सुमारास घडली. याबाबत पावतीमधे फेरफार, अवैध्य वाळू वाहतूक याबद्दल चालकाविरुद्ध पोलिसात गुन्हाची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अवैध्य वाळू वाहतुक बाबत वावडदा येथील तलाठी राहूल पितांबर अहिरे हे आज वावडदा येथील पेट्रोल पंपाजवळ सकाळी दहाला थांबलेले होते. यावेळी सुनील हिरामण जाधव (रा. हरिविठ्ठल नगर) जळ गाव हे एमएच 19 एटी 4685 या क्रमांकाचे डंपर घेवून येताना दिसले. तलाठी अहिरे यांनी डंपर आडवून चालक जाधव यांच्याकडे पावतीची मागणी केली. दाखवलेली पावतीमध्ये फेरफार असल्याचे अढळून आली. याबाबत तलाठी अहिरे यांच्या फिर्यादीवरून डंपर चालक सुनील जाधव यांच्या विरुद्ध अवैध्य वाळू वाहतुक, तसेच पावतीत फेरफार केल्याबद्दल औद्योगीक वसाहत पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास पोलिस कॉन्स्टेबल श्री. राठोड करीत आहे.

पावतीच्या तारखेत केला बदल
तलाठी अहिरे यांनी डंपर आडवून चालक सुनील जाधव याला पावतीची मागणी केली. यावेळी जाधव यांनी दाखवलेल्या पावतीमध्ये फेरफार केलेला अढळून आला. पावतीमुळे ही 1 तारखेची होती. पण 1 च्या पुढे 2 लिहून ही 12 तारखेची पावती असल्याचे आढळून आले.