नरदेवळा । नगरदेवळा येथील सुफी संत जबरदस्त बापू यांचे शुक्रवारी निधन झाले होते. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी माजी आपदार दिलीप वाघ यांच्यासह त्यांचे सहकारी मियाचा नाला या ठिकाणी आले असता टाकळी – नगरदेवळा रस्त्यावर सुसाट वेगाने येणारे तीन ट्रक्टर जोराने हॉर्न वाजवत येत असंताना गर्दीमध्ये अपघात होऊ नये यासाठी सदर ट्रक्टर अडवले असता त्यामध्ये अवैधरित्या वाळूची वाहतूक करतांना आढळून आलक. माजी आमदार दिलीप वाघ यांन त्वरित तहसीलदार बी.ए. कापसे यांच्याशी संपर्काद्वारे माहिती दिली. त्यानंतर तहसीलदार यांच्या सुचनेनुसार तलाठी व कोतवाल यांनी घटनास्थळी येवून पकडलेल्या ट्रक्टरमधील वाळूचा पंचनाम करून तिन्ही ट्रक्टर नगरदेवळा पोलिसात जप्त करण्यात आले. तिन्ही ट्रक्टर जि.प.सदश्य रावसाहेब मनोहर गिरधर पाटिल असे नाव लिहले. त्यामुळे ट्रक्टर जरी जिल्हा परीषद सदस्यांचे असले तरी अवैध वाळू चोरी व वाळू वाहतूक कोणाच्या आशीर्वादने होते आहे व खरे वाळू तस्कर कोण असल्यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. माजी आमदारानी ट्रक्टर पकडल्यामुळे महसुल खाते व पोलिस यंत्रणा पुढे काय करवाई करते याकडे जनतेचे लक्ष लागून आहे.