जळगाव । गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या विनापरवाना वाळू वाहतूक करणार्या ट्रक्टर चालकाविरुद्ध कारवाई करण्यात आली. आव्हाने येथील तलाठी मनोहर शिवराम बाविस्कर यांना वाघनगर ते रामानंद नगरदरम्यान कैलास भोई हा चालक ट्रॅक्टर क्र.एमएच 19-बीजी 8928 मधून अवैधरित्या विनापरवाना वाळू वाहतूक करीत असतांना आढळून आला. त्याच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.