रावेर : तालुक्यातील खिरवडनजीक अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टरसह ट्रॉली महसूल प्रशासनाने जप्त करीत दंडात्मक कारवाई केली.
या कारवाईने अवैधरीत्या वाळूचा उपसा करणार्यांमध्ये खळबळ उडाली. खिरवड गावातून अवैध वाळू घेऊन रावेरच्या दिशेने येणारे दोन टॅ्रक्टर व ट्रॉली तलाठी मुकेश तायडे यांनी पकडले. कारवाईसाठी ही वाहने तहसील कार्यालयाच्या आवारात आणण्यात आली. दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याचे महसूल प्रशासनाने सांगितले.