शासकीय काम करणार्यांनी केली होती शिवीगाळ
जळगाव । भडगाव तालुक्यातील मांडकी शिवारातील गिरणा नदीच्या पात्रात अवैधरित्या वाळूची ट्रक्टरद्वारे वाहतूक करत असल्याने भडगाव तलाठीसह इतर कर्मचार्यांरी कारवाई करत असतांना शासकीय कामात अडथळा निर्माण करून शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणाच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपीचा जामीन फेटाळला आहे. अधिक माहिती अशी की, 7 डिसेंबर 2017 रोजी मध्यरात्री 12.30 वाजता भडगाव तालुक्यातील मांडकी शिवारात अवैधरित्या मोठ्या प्रमाणावर ट्रक्टरद्वारे वाळूची वाहतूक करित असल्याचे आमडदे येथील तलाठी विलास शिंदे यांना माहिती मिळाल्यानंतर कर्मचार्यांसह घटनास्थळी गेल्यानंतर कारवाई करत असतांना आरोपी नविन उर्फ लक्ष्मिकांत दिलीप परदेशी (वय-29) यांच्यासह इतर आठ जणांनी तलाठी व सोबत असलेल्या कर्मचार्यांना दमदाटी करत मारहाण केली. त्यामुळे सोबत असलेल्या कर्मचार्यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की व शासकीय कामात अडथळा निर्माण करून अंधाराचा फायदा घेत ट्रॅक्टरमध्ये वाळू भरून निघून गेले. तलाठी विलास शिंदे यांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलिस स्थानकात आरोपीसह इतर 9 जणांवर गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार आरोपी नविन परदेशी याला 11 मार्च 2018 रोजी अटक करण्यात आली होती. आज आरोपी नविन परदेशी यांनी जामीनासाठी अर्ज केला असता न्या.पी.वाय.लाडेकर यांनी जामीन अर्ज फेटाळला आहे. सरकारतर्फे अॅड.रमाकांत सोनवणे यांनी कामकाज पाहिले.