अवैध वाळू वाहतूक : शेंदुर्णीत ट्रक जप्त

Illegal sand transport on Araniwar : Truck seized in Shendurni जामनेर : अवैध वाळू वाहतूक ऐरणीवर आली असून जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी शहरात अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पहूर पोलिसात सोमवार, 26 डिसेंबर रोजी रात्री 11 वाजता ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अवैध वाळू वाहतूक ऐरणीवर
जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील देवीच्या मंदिराजवळून सोमवार, 26 डिसेंबर रोजी सकाळी 6.15 वाजता बेकायदेशीररीत्या वाळूची वाहतूक करणारा ट्रक (एम.एच.19 सी.टी.5848) जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिस कर्मचारी विजयकुमार विश्वास पाटील यांच्या फिर्यादीवरून ट्रकचालक संजय परदेशी (पूनगाव, ता.पाचोरा) याच्या विरोधात पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार प्रशांत विरनारे करीत आहे.