तळोदा। अवैधपणे रेती वाहतुक करणारे 2 डंपर व 5 ट्रॅक्टर यांच्यावर कारवाई करीत त्यांना ताब्यात घेण्यात आले. तळोद्याचे नवनियुक्त तहसीलदार योगेश चंद्रे यांचा मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. आणि यामुळे अवैध रेती वाहतूक करणार्यांचे धाबे दणादले आहे. या कारवाईचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात आले आहे. तळोद्याचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी शासनाची रॉयल्टी चुकवून अवैधपणे वाळू वाहतुक करणार्यांवर चाप बसावा याकरीता मोहीम हाती घेतली आहे. यानुसार आज तहसीलदार चंद्रे यांचा मार्गदर्शनाखाली तलाठी वी. यु. कटारे, पी. एम. भिंगारे, पी. ए. अहिरे, सी. एन. सरगर, वानखेडे व डी. बी. हांडे यांच्या पथकाने शहरातील उपजिल्हा रुग्णालयजवळ, चिनोदा फाटा, फॉरेस्ट चेक नाका व कॉलेज चौफुली अश्या चार ठिकाणी अवैधपणे रेती वाहतुक करणार्या 2 डंपर व 5 ट्रॅक्टर यांच्यावर कारवाई करीत त्यांना ताब्यात घेतले.
रॉयल्टी चुकवून रेती वाहतूक
योगेश चंद्रे यांची तळोद्याचे तहसीलदार म्हणून दोन दिवसांपूर्वीच नियुक्ती झाली आहे. चंद्रे यांनी आल्या आल्याचं त्यांनी बेधडकपणे, अवैध रेतीची वाहतूक करणार्या वाहनांवर कडक कारवाई केली आहे. याकारवाईचा सर्व स्तरातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पुढेही अशीच कार्यवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. रॉयल्टी चुकवून रेती वाहतूक सर्रासपणे सुरू होती. परंतु, तहसीलदार चंद्रे यांनी आज धडक कारवाई करत रॉयल्टी चुकवणार्या रेती वाहतूकदारांवर वचक बसविण्याचा प्रयत्न केला. तर रॉयल्टी चुकविणार्यांवर भविष्यात कारवाईंचे संकेत तहसीलदारांनी दिले आहेत.
आज आमच्या पथकाने अवैध पणे रेती वाहतूक करणार्या वाहनांवर कारवाई केली आहे, कारण त्यांनी रेग्युलर रॉयल्टी भरली नव्हती आणि शासनाची रॉयल्टी चुकवून रेती वाहतूक करणे हा कायदेशीररीत्या गुन्हा आहे. तसेच यापुढेही तळोदे शहरात व तालुक्यात कोठेही अवैध रेती वाहतूक होत असेल तर अश्याच प्रकारची कडक कारवाई करण्यात येईल. तसेच ज्यांनी रॉयल्टी भरली नसेल त्यांनी तात्काळ रॉयल्टी भरावी आणि शासनास साह्य करावे.
योगेश चंद्रे. तहसीलदार, तळोदा
जप्त केलेले डंपर, टॅक्टर्स
ट्रॅक्टर क्रं. एम. एच. 39 – 2115 मालक वेस्ता महारु पावरा, ट्रॅक्टर क्रं. एम. एच. 39 – एन 3449 मालक रायसिंग जयसिंग पाडवी, ट्रॅक्टर क्रं. एम. एच. 39 – 5367 मालक कैलास टिल्या चौधरी, ट्रॅक्टर क्रं. एम. एच. 39 – एफ 4924 मालक दिनेश हात्या डमकुळ, ट्रॅक्टर क्रं. एम. एच. 18 – 9346 मालक मिथुन देवीसिंग धानका आणि डंपर क्रं एम. एच. 21 – एक्स 5812 मालक फिरंग्या जहाग्या वळवी इत्यादी वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. यांमध्ये अंदाजे 1 लक्ष 10 हजार रुपये किंमतीची एकूण 8 ब्रास रेती होती. या वाहनांना ताब्यात घेवून तहसील कार्यालयात आणण्यात आले.