अवैध वाहतुकीवर एसटीची कारवाई

0

मुंबई । एसटीची कमी होणारी प्रवासी संख्या आणि वाढणारा तोटा, यासाठी कारणीभूत असलेल्या अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी महामंडळाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वर्षात महामंडळाच्या सुरक्षा आणि दक्षता विभागाने 3500 अवैध वाहनांवर कारवाई करून त्यांच्याकडून 21 लाख रुपयांचा दंडदेखील वसूल केलेला आहे. त्याचवेळी कंडक्टरांकडून होणार्या अपहारविरोधात 1100 जणांविरोधात कारवाई करून 2 लाख 50 हजारांचा दंड घेतला आहे. महामंडळाकडे सुमारे 18 हजार गाड्या तर एक ते सव्वा लाख कर्मचारी आहेत.

एसटीकडून विशेष पथकाची नियुक्ती
महामंडळात होणार्या गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी सुरक्षा आणि दक्षता पथक कार्यरत आहे. या पथकातर्फे अफरातफर, आर्थिक गैरप्रकार, तक्रारींची चौकशी, बसेसची पाहणी, चालकांवर लक्ष ठेवणे, खेरदीप्रमाणे भंगार विक्रीत गैरप्रकार न होण्याची काळजी घेतली जाते. अशातच राज्यात होणार्या अवैध वाहतुकीला रोखण्याचे कामदेखील पथकातर्फे केले जाते. एसटीला सर्वात मोठा फटका हा अवैध वाहतुकीचा बसतो. यावर नियंत्रण ठेवण्यात परिवहन विभाग, महामार्ग पोलीस, वाहतूक पोलिसांना म्हणावे तसे यश आलेले नाही. अवैध वाहतुकीला रोखण्यासाठी सुरक्षा आणि दक्षता पथकाने वर्षभरात अनेक मोहीमा राबवल्या