अवैध वाहतूकदारांसह वाहतूक नियम मोडणारे पोलिसांच्या रडारवर

0

भुसावळात सलग दुसर्‍या दिवशी बाजारपेठ पोलिसांची धडक कारवाई

भुसावळ- अवैधरीत्या प्रवाशांची वाहतूक करणार्‍या वाहतूकदारांसह वाहतुकीचे नियम मोडणार्‍यांविरुद्ध नूतन पोलीस उपअधीक्षक गजानन राठोड यांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर बाजारपेठ पोलिसांतर्फे धडक कारवाई केली जात आहे. सोमवारी बाजारपेठ पोलीस ठाण्यासमोर वाहतुकीला अडथळा ठरतील या पद्धत्तीने अ‍ॅपे रीक्षा लावणार्‍या तीन चालकांविरुद्ध 283 प्रमाणे खटले दाखल करून त्यांना न्यायालयात पाठवण्यात आले तर वाहतुकीचे नियम मोडणार्‍या 15 दुचाकीस्वारांवर प्रत्येकी 200 रुपयांप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आली शिवाय अवैधरीत्या प्रवाशांची वाहतूक करणार्‍या दोन वाहनांवरही 66/192 प्रमाणे कारवाई व सीआरपीसी 109 प्रमाणे तिघांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदलाल परदेशी, ईश्‍वर भालेराव, दीपक पाटील, उमाकांत पाटील आदींच्या पथकाने केली.