निरीक्षक चंद्रकांत सरोदे उतरले रस्त्यावर : नऊ अॅपे रीक्षा जप्त
भुसावळ : अवैध वाहतुकीला शहरात आलेला ऊत व जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सोमवारी घेतलेल्या गुन्हे आढावा बैठकीनंतर बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांनी मंगळवारी सकाळपासून रस्त्यावर उतरत तब्बल नऊ अवैध प्रवासी वाहतूक करणार्या अॅपे रीक्षा ताब्यात घेत पोलीस ठाण्यात जमा केल्या.
या कारवाईमुळे अवैध वाहतूकदारांमुळे मोठी खळबळ उडाली. या रीक्षा चालकांना न्यायालयात हजर करण्यात येणार असून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून शहरात मोठ्या प्रमाणावर ऊत आला आहे.