कृषी विभागाच्या कारवाईने बियाणे विक्रेत्यांचे दणाणले धाबे
शहादा- तालुक्यातील कर्जोद येथे आरआरबीटी व एचटीबीटी या बियाण्यांची अवैधरीत्या विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून कृषी विभागाने टाकलेल्या धाडीत चुनीलाल शामभाई पटेल यांच्या घरान 120 किलो बियाणे जप्त करण्यात आले. बुधवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. हे बियाणे बनावट की असली याबाबत मात्र कळू शकले नाही. कृषी विकास अधिकारी प्रदीप लाटे, जिल्हा गुण नियंत्रण अधिकारी अरूण तायडे, तालुका कृषी अधिकारी शहादा प्रवीण भोर, प्रशांत शेंडे, कृषी सहाय्यक मनोज खैरनार, सैंदाने, पद्माकर पाटील, कॉन्स्टेबल निलेश वसावे यांनी कारवाई केली.