अवैध व्यवसाय भोवले ; धुळ्यातील उपनिरीक्षकासह हवालदाराचे निलंबन

0

आमदार अनिल गोटेंच्या धाडीनंतर पोलीस अधीक्षक एम.रामकुमार यांची कारवाई

धुळे- शहरातील पांझरा नदीकिनारी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर आमदार अनिल गोटे यांनी धाड टाकत पोलिसांच्या कारभाराचा पंचनामा केल्याने पोलीस टिकेचे धनी ठरले होते. या बाबीची गांभीर्याने दखल घेत पोलीस अधीक्षक एम.रामकुमार यांनी शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक आर.बी.मांडेकर व हवालदार ए.टी.सोनवणे यांचे निलंबन केले आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.