पहूर। येथे बजरंग दलाच्या युवकांनी बुधवारी मध्यरात्री दोन आयशर गाड्यंचा पाठलाग करून 29 गुरे पकडली. बाजारभावाप्रमाणे या पशुधनाची किंमत चार लाख पाच हजार रूपये असून ते जप्त करण्यात आले आहे. नशिराबाद येथून औरंगाबाद येथे अवैधरित्या जानवरे नेली जात असल्याचे उघडकीस आले आहे.
लीसांत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून चालकांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल असतांना पोलीसांनी मात्र माहिती देण्यास टाळाटाळ केली. दोन ट्रक मधुन 29 गुरांना कोंबून वाहतूक करण्यात येत होती. ट्रक नशिराबाद येथून औरंगाबाद येथे जात असल्याचे बजरंग दलाच्या युवकांच्या लक्षात आले असता या युवकांनी पोलीसांना सोबत घेवून वाहन अडविले. चालकाकडे कागदपत्र नसल्याचे उघडकीस आले. गोपाळ गुळे, शिवा पाटील, बंटी पाटील यांनी गुरांनी भरलेली वाहने पकडली. पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून चालक शेख कलीम शेख युसुफ व मनसुद अली हयात अली यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.