अशी अनोखी मोटारसायकल कधी पाहिली नसेल…

0

नवी दिल्ली- मोटारसायकलच्या अती वापरामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. प्रदूषण रोखण्यासाठी शासन विविध उपाय करत आहे. जुन्या इंजिनच्या गाड्या तयार करणे आता बंद झाल्या आहेत. बीएस ४ इंजिनच्याच गाड्या आता बाजारात उपलब्ध आहे. दरम्यान भारतीय क्रिकेटर वीरेंद्र साहेवाग यांनी आपल्या ट्वीटरवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात एक अशी मोटारसायकल आहे. ती पाहून खूप आश्चर्य वाटते. कारण ती एखाद्या झाडाझुडूपाप्रमाणे तयार करण्यात आली आहे. हा व्हिडीओ शेअर करून वीरेंद्र साहेवागने ‘ बाईक से प्यार और नेचर से भी’ अशी कमेंट केली आहे.