अशी अफवा आहे वाजिद खान बद्दल…

0

मुंबई: बॉलिवूडचे प्रसिद्ध संगीतकार साजिद-वाजिद यांच्या विषयी एक अफवा अशी सुरु आहे की वाजिद यांची अशी प्रकृती बिघडल्यामुळे वाजिदला रुग्णालयात दाखल केले आहे. सोशल मीडियावरही चाहत्यांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केल्याचं पाहायला मिळत होतं. मात्र वाजिद यांनी या अफवा असल्याचं म्हटलं आहे.

वाजिद खान यांच्या आर्टेरिअलमध्ये ब्लॉकेज (arterial blockage) आढळून आल्यामुळे सोमवारी त्यांना रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आल्याची अफवा पसरली होती. या अफवेमुळे वाजिद यांनी मानसिक त्रास झाला असून या अफवा असल्याचं वाजिद यांनी ट्विटरच्या माध्यमातून स्पष्ट केलं आहे.

माझी प्रकृती खालावल्याचे वृत्त खोटे आहे. मला काहीही झालं नसून मी ठीक आहे. असे वाजिदने खुद्द सांगितले आहे.