अशी झाली किंग खानची दिवाळी ग्रँड पार्टी

0

मुंबई : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने आपल्या ‘मन्नत’ बंगल्यावर दिवाळीची ग्रँड पार्टीचे आयोजन केले होते. यादरम्यान, काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

शाहरुखची पत्नी गौरी खानने आपल्या कुटुंबासोबत दिवाळीचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले. यात शाहरुख, सुहाना आणि अबराम दिसत आहे, मात्र आर्यन गायब असल्याचे दिसतेय. यावर अनेक यूजर्सनी शाहरुखला प्रश्न विचारले. याला उत्तर देत त्याने लिहिले, ‘अरे यार अचानक आर्यनची आठवण आली’.

मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुखचे दोन्ही मुले सुहाना आणि आर्यन परदेशात शिकत आहे. सध्या सुहाना खास सुट्टी घेऊन घरी परतली आहे, परंतु आर्यन येऊ शकला नाही.