अशोक गेहलोत चिंतामुक्त?; बैठकीत आनंदाचे वातावरण

0

जयपूर: राजस्थानचे उपमुख्यमंत्री कॉंग्रेस नेते सचिन पायलट यांनी बंडाचा झेंडा हाती घेतल्याने अशोक गेहलोत सरकारची चिंता वाढली आहे. अशोक गेहलोत यांच्याशी मतभेद झाल्याने त्यांनी बंद पुकारले आहे. दरम्यान आता कॉंग्रेस आमदारांची बैठक बोलविण्यात आली असून बैठकीत कॉंग्रेस नेते आमदारांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. बैठकीत कॉंग्रेससह अपक्ष असे ११८ आमदार हजर असल्याने मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे पारडे जड दिसून येत आहे. सचिन पायलट यांच्यावर पक्षविरोधी कार्यवाही केल्याने कारवाई होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सरकार टिकणार असल्याचा दावा देखील मुख्यमंत्र्यांनी केला असून त्यांचे हावभाव देखील सकारात्मक दिसून येत आहे. बैठकीला हजर राहण्याबाबत कॉंग्रेस आमदारांना आदेश देण्यात आले होते. सचिन पायलट यांना देखील बैठकीला उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात आले आहे. मात्र सचिन पायलट बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता सचिन पायलट यांच्याच अडचणीत वाढ झाली आहे.