अमळनेर । अमळनेरचे गटशिक्षणाधिकारी ए.डी.पाटील यांची बदली झाल्याने त्याजागी मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. जळगांव यांनी अशोक बिर्हाडे यांची त्याजागी नेमणूक केली. यापूर्वी बिर्हाडे साहेब यांनी शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून 20 वर्ष सेवा केली आहे. दोन वेळेस गटशिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार त्यांना यशस्वीरित्या भूषविला आहे. आता अमळनेर तालुका संपूर्ण गुणवत्ता पूर्ण, डिजीटल शाळा तसेच अप्रगत शाळा 100 टक्के करण्याचा मानस आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे सर्व स्तरावर स्वागत होत आहे.