मुंबई । हास्यविनोदाने सिनेजगत गाजवलेले ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. शहरातील बीएमसीसी मैदान येथे येत्या 21 फेब्रवारी रोजी हा खास सोहळा पार पडणार आहे. याच कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत राज ठाकरे घेणार आहेत.
कार्यक्रम संध्याकाळी पाच वाजेपासून सुरु होणार असल्याची माहिती मिळते. सराफ यांना जाहीर झालेल्या पुरस्कारामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मराठी चित्रपटसृष्टील अशोक सराफ यांचे आभाळाप्रमाणे आहे. नायकापासून खलनायक ते विनोदी अभिनेता असा यशस्वी प्रवास करणारे अशोक सराफ यांची लोकप्रियता अजूनही कमी झालेली नाही. सन 1969 ते आजपर्यंत ते मराठी चित्रपटसृष्टीचा हिस्सा आहेत आणि वयाच्या 70व्या वर्षीही प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत.