अश्लिल चित्रफित प्रकरणी तत्कालीन पोलिस उपअधीक्षकांची साक्ष

भुसावळ : अश्‍लील चित्रफीत व्हायरल प्रकरणी सन 2012 मध्ये भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात तत्कालीन तपास अधिकारी तथा कल्याण येथील डीसीपी विवेक पानसरे यांची सोमवारी जिल्हा न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तासभर साक्ष घेण्यात आली.

तत्कालीन उपअधीक्षकांची ऑनलाईन घेतली साक्ष
खडका गावात आणि वेल्हाळे ग्रामपंचायतीच्या पंप हाऊसमध्ये 2012 मध्ये अश्लिल चित्रफित तयार केली होती. या प्रकरणी 16 जानेवारी 2012 या दिवशी तालुका पोलिस ठाण्यात आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन डीवायएसपी विवेक पानसरे यांनी केला होता. याप्रकरणी सोमवारी जिल्हा न्यायालयात न्यायाधीश डी.एम.शिंदे यांनी सोमवारी दुपारी चार वाजता पानसरे यांची एक तासभर साक्ष नोंदवून घेतली. सरकारी वकील नितीन खरे यांनी पानसरे यांची सर तपासणी नोंदवली तर संशयीतातर्फे अ‍ॅड.जगदीश कापडे यांनी उलट तपासणी घेतली. यावेळी पानसरे यांनी या प्रकरणात जप्त केलेला मोबाईल, मेमरी कार्ड, फॉरेन्सिक लॅब अहवाल पानसरे यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दाखविला.