अश्लिल मॅसेस पाठविणा-या फौजीवर गुन्हा

0

जळगाव – नातेवाईक महिलेकडे आलेल्या फौजीने तिच्या महिला पोलीस मैत्रिणीला पाहिल्यानंतर अश्लील मॅसेज पाठविल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री घडली. या प्रकाराने घाबरलेल्या महिला पोलीस कर्मचारी हिने आरसीपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर प्रकार टाकल्यानंतर याप्रकरणी रात्री उशिरा जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात येऊन फौजीला पोलिसांनी पोलीस लाईनमधून ताब्यात घेतले. अमोल सोनवणे (वय- ३१) असे फौजीचे नाव असून तो मुळ अकोला येथील आहे.

अमोल सोनवणे हा लष्करातील जवान मुळ अकोला येथील असून ह.मु. सटाणा (नाशिक) येथे वास्तव्यास आहे. सोमवारी हा फौजी त्याची नातेवाईक असलेल्या महिलेकडे पोलीस लाईनमध्ये आला होता. दरम्यान या महिलेची असलेली मैत्रिण आरसीपीमध्ये महिला पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे. तिला भेटण्यासाठी आली असता फौजीने तिला बघीतले. नंतर स्वत:ची ओळख करून दिली. महिला कॉन्स्टेबलच्या मोबाईल क्रमांकही काढून घेतला.

रात्री फौजीने त्याच्या मोबाईलवरून महिला पोलीस यांच्या मोबाईलवर मेसेज पाठविला, फौजीने त्यात लिहीले हाय, आय लाईक यू, फौजी आवडतो का? हा आलेला मेसेज बघून . तडक महिलेने आरसीएफच्या अधिकाऱ्यांच्या कानावर प्रकार टाकला. त्यांनी अहवाल तयार करून त्यांना फौजीविरूध्द तक्रार देण्यासाठी रात्रीच जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात पाठविले. पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी महिलेची कैफियत ऐकून घेतली. नंतर या प्रकरणी गुन्हा रात्री उशीरा दाखल करून घेतला. तत्काळ पोलीस कर्मचाऱ्यांना फौजी महिलेच्या नातेवाईकाच्या घरी पाठवून फौजीला ताब्यात घेत जिल्हापेठला आणले. फौजीने दिलेल्या माहितीनुसार तो लष्करात १५ वर्षांच्या बॉण्डवर सेवेत कार्यरत आहे. सेवेची १३ वर्षे झालेली असून ०२ वर्ष सेवेची बाकी आहेत. फौजी अविवाहित आहे. सेवा संपल्यानंतर लग्न करण्याचा मनोदय त्याने व्यक्त केला. दरम्यान आज फौजीला न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.