वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल
जळगाव । भुसावळ तालुक्यातील अकलुद येथील ३५ वर्षीय महिलेवर मानपूर शिवारातील शेतात लैगींक अत्याचार करण्यात आले. याची चित्रफित बनवून ब्लॅकमेल करुन दोन लाखाची मागणी करीत असल्याप्रकरणी एकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळवेल येथील माहेर असलेली ३५ वर्षीय महिला अकलुद येथे रहिवास करीत आहे.
या महिलेने उदय केशव बर्हाटे (रा. वरणगाव) याला भाऊ मानला असून या दोघांनी मानपूर शिवारातील बर्हाटे यांचे शेत निम्मे बटाईने केले होते. शेतात एकटी असल्याचा गैरफायदा घेत ३० जून रोजी बळजबरीने लैगिंक अत्याचार करुन मोबाईलमध्ये महिलेचे अश्लील व्हिडिओ तयार केला. तसेच घडलेल्या प्रकाराची कोणाकडेही वाच्यता करू नये अशी माहिलेला धमकी दिली. याचा गैरफायदा घेत उदय बर्हाटे याने २८ ऑगस्टपर्यंत लैगींक अत्याचार करून महिलेला ब्लॅकमेल करुन दोन लाखाची मागणी करीत होता. म्हणून उदय बर्हाटे विरूध्द वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक जगदीश परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय निलेश वाघ, हेडकॉन्स्टेबल मजहर पठाण करीत आहे.