हैदराबाद । भारत विरूध्द बांगलादेश सुरू असलेली कसोटी सामना सुरू आहे. चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाजांचा राहिला आहे. भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम प्रदर्शन केले. या सामन्यादरम्यान ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने आपल्या कसोटी कारकीर्दीतील 250 वा गडी बाद करून एक विश्वविक्रम आपल्या नावावर नोंदविला.तो ही फक्त 45 सामन्यात हा विक्रम नोंदविला आहे.या विश्वविक्रमासोबत ऑस्ट्रेलियाचे माजी जलदगती गोलंदाज डेनिस लिली यांचा सुध्दा विक्रम आर.अश्विनने मोडीत काढला आहे.यामुळे बांगलादेशा बरोबरीची कसोटीचा चौथा दिवस आर.अश्विनसाठी विश्वविक्रमचा दिवस राहिला आहे.
अव्वल स्थानी विराजमान
6 नोव्हेंबर 2011 रोजी कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघात ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनचे पर्दापण केले होते.त्यानंतर टीम इंडियाचा गोलंदाजीचा आधारस्तंभ झाला आहे.ज्या-ज्या वेळी संघाला विकेटची आवश्यकता असायची त्या-त्या वेळी हुकमी एक्का आपल्या गोलंदाजीच्या जादूने विकेट घेवून विरोधी संघाला धक्का देत असे.या लौकिकाला साजेशीच कामगिरी त्याने बांगलादेशविरुद्धच्या हैदराबाद कसोटीतही केली. शाकीब अल हसन आणि मोहम्मद रहीम यांची जोडी फोडून त्याने भारताला काल मोठा दिलासा दिला होता. त्यानंतर आज शतकवीर रहीमला वृद्धिमान साहाकरवी झेलबाद करून अश्विनने बांगलादेशचा डाव गुंडाळलाच, पण 250वी कसोटी विकेटही मिळवली. इतक्या कमी सामन्यांमध्ये हा टप्पा गाठणे आत्तापर्यंत कुणालाच जमले नव्हते.
बांगलादेशविरुद्ध हैदराबाद येथे सुरू असलेल्या एकमेव कसोटीच्या चौथ्या दिवशी आज अश्विनने बांगलादेशचा कर्णधार मुशफिकूर रहिमची विकेट काढत कसोटी कारकीर्दीतील 250 बळींचा टप्पा ओलांडला.250 कसोटी विकेट्स झटपट घेणार्या गोलंदाजांच्या यादीत अश्विन अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. त्यानं 45व्या कसोटीतच हा मैलाचा दगड गाठला आहे.भारतीय क्रिकेटपटूंमध्ये हा विक्रम टीम इंडियाचे विद्यमान प्रशिक्षक आणि फिरकीपटू अनिल कुंबळे यांच्या नावावर असून, कुंबळे यांनी हा विक्रम 55 कसोटींमध्ये आपल्या नावावर नोंदवला होता. पण आपल्या गुरुलाच मागे टाकून अश्विनने हा नवा विक्रम आपल्या नावे केला आहे.250 कसोटी विकेट्स झटपट घेणार्या गोलंदाजांच्या यादीत अश्विन अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. त्यानं 45व्या कसोटीतच हा मैलाचा दगड गाठला आहे.
लिलीचा विक्रम अश्विनने मोडला
डेनिस लिली यांनी हा विक्रम 48 कसोटी सामन्यात केला होता. तर दक्षिण आफ्रिकेचे जलदगती गोलंदाज डेल स्टेन यांनी हाच विक्रम 49 सामन्यात नोंदवला. तसेच दक्षिण आफ्रिकेचे एलन डोनाल्ड यांनीही 50 कसोटी सामन्यात 250 गडी बाद केले.या शिवाय हा विक्रम पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज वकार युनूस आणि श्रीलंकेचा माजी फिरकीपटू मुथैया मुरलीधरनने 51 सामन्यात यांच्या नावावरही असून, या दोघांनीही 51 कसोटी सामन्यात हा टप्पा पूर्ण केला. तर न्यूझीलंडच्या रिचर्ड हेडली आणि मेल्कम मार्शल यांनी 53 सामन्यात हा विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे. तर भारतीय संघाचे विद्यमान प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी 250 गडी बाद करण्याचा विक्रम 55 कसोटीत केला होता.तर पाकिस्तानचे इम्रान खान यांनी 55 कसोटी हा विक्रम केला होता. या दिग्गजांना पछाडत अश्विनने हा विक्रम आपल्या नावे केला.