अश्विन, जडेजाला विश्रांती

0

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी संघ निवड जाहीर केली. इंग्लंड संघाविरोधात खेळल्या जाणाऱ्या टी-२० मालिकेसाठी फिरकीपटू आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा यांना विश्रांती देण्यात आली असून त्यांच्याऐवजी लेगस्पिनर अमित मिश्रा आणि परवेज रसूल यांची निवड करण्यात आली आहे. इंग्लंड संघाविरोधात खेळल्या जाणाऱ्या टी-२० मालिकेसाठी फिरकीपटू आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा यांना विश्रांती देण्यात आली असून त्यांच्याऐवजी लेगस्पिनर अमित मिश्रा आणि परवेज रसूल यांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान पहिला सामना कानपूर येथे खेळला जाणार असून कसोटी व एकदिवसीय मालिकेनंतर टी-२० मालिका जिंकण्याचा देखील निर्धार टीम इंडियाने केला आहे.

ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी तयारी
कसोटी मालिकेत अश्विन आणि जडेजा यांनी चमकदार कामगिरी केली होती. दोघांनीही अष्टपैलू कामगिरी करत फलंदाजी व गोलंदाजीतही उल्लेखनीय खेळी केली होती. आगामी ऑस्टेलिया विरूद्धच्या मालिकेसाठी तयार करण्यास वेळ मिळावा म्हणून त्यांना विश्रांती देण्यात आली आहे. इंग्लंड आणि भारत यांच्याविरोधात तीन टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. यातील पहिला सामना येत्या २६ जानेवारी रोजी कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडिअमवर खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर दुसरा सामना २९ जानेवारी रोजी नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर तर तिसरा सामना एक फेब्रुवारीला बंगळुरूच्या के. एम. चिन्नास्वामी स्टेडिअमवर खेळवण्यात येणार आहे. यापूर्वी इंग्लंड विरोधात खेळण्यात आलेल्या कसोटी मालिकेत टीम इंडियाने ४-० व तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत २-१ ने विजय मिळवला आहे.

सामन्यात आईची विशेष आठवण
टी २० मालिकेतील पहिल्या कानपूर सामन्यात यंदा भारतीय खेळाडूंना त्यांच्या आईची सोबत मिळणार आहे. ग्रीन पार्कवर होत असलेल्या पहिल्या सामन्यासाठी भारतीय टीम सोमवारी कानपूरला पोहोचली. या शहरातील एकमेव पंचतारांकित हॉटेलमध्ये टीम राहणार असून हॉटेल व्यवस्थापनाने त्यासाठी खास व्यवस्था केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रत्येक भारतीय खेळाडूच्या रूममध्ये त्याच्या आईचा फोटो लावला जाणार आहे त्याच्या खाली मेसेज असेल. कोहली, टीम मॅनेजर व माजी कर्णधार धोनी यांच्यासाठी प्रेसिडेन्शियल स्यूट राखले गेले आहेत. विराटसाठी मोरक्कन चिकन, धोनीसाठी चिकन बटर मसाला, युवीसाठी कढी खिचडी व गोबी पराठे तर अश्विनसाठी पास्ता तयार ठेवला गेला आहे. इंग्लंड टीमसाठी इटालीयन कुकीज तयार केल्या गेल्या आहेत.

निवडलेला संघ पुढीलप्रमाणे-
विराट कोहली (कर्णधार), के. एल. राहुल, ऋषभ पंत, सुरेश रैना, युवराज सिंग, मनीष पांडे, महेंद्रसिंह धोनी, हार्दिक पांड्या, आशिष नेहरा, भुवनेश्वर कुमार, अमित मिश्रा, यजुवेंद्र चहल, जसप्रित बुमराह, परवेज रसूल.