जळगाव- शहरातील पोलीस वसाहतीत एक ते दोन दिवसांपासून मुलीशी अश्लिल चाळे करणार्या एका पोलिसाला वसाहतील पोलीस कर्मचार्यांनी जिल्हापेठ पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना रविवारी नऊ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान मद्यपी पोलिसांमुळे ठाण्यात पोलीस कर्मचार्याचाही चांगलाच गोंधळ उडाला.
पोलीस कर्मचारी त्याच्या वसाहतीतील निवास्थानात एका मुलीला घेवून आला आहे. तो व मुलगी यांच्यात अश्लिल चाळे सुरु असल्याच्या प्रकाराने इतर रहिवासी त्रस्त होते. दरम्यान रविवारी इतर रहिवासी पोलीस कर्मचार्यांनी कर्मचार्याच्या खोलीला बाहेरुन कुलूप लावले व मुलीसह त्या कर्मचार्याला डांबून ठेवले. यानंतर दारुच्या नशेत असलेल्या कर्मचार्याने गोंधळ घातला असता इतरांनी याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यावरुन पोलिासांनी घटनास्थळ गाठत मुलीसह तरुणाला जिल्हापेठ पोलीस ठाण्यात नेले. याठिकाणी मुलीने पोलीस कर्मचारी हा आत्याचा मुलगा असून एक ते दोन महिन्यात लग्न होणार असल्याचे सांगितले. यानंतर तक्रारीसाठी आलेले कर्मचारीही माघारी परतले. व प्रकरणावर पदडा पडला. जिल्हापेठ पोलीस ठाण्यात या कर्मचार्याने दारुच्या नशेत उशीरापर्यंत चांगलाच गोंधळ घातला. इतर कर्मचारी त्याची समजूत घालत होेते मात्र समजण्याच्या मनस्थितीत नव्हता.