अश्‍लील चाळे केल्याप्रकरणी तिघांना अटक

0

नारायणगाव :– रात्रीच्या वेळी रस्त्याने जाणार्‍या अल्पवयीन मुलीशी अश्‍लील चाळे करून तिला अश्‍लील भाषेत शिवीगाळ करणार्‍या तीन जणांवर नारायणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक अजय गोरड यांनी दिली.साजीद मंडल (वय 23, नारायणगाव), आकाश गोफणे (वय 22, रा. नारायणगाव), प्रशांत मुळे (वय 26, रा. नारायणगाव) यांना पोलिसांनी अटक केली आहे. फिर्याद नारायणगाव हनुमान चौक येथील अल्पवयीन मुलीने दिली आहे.या तिघांना खेड सत्र न्यायालयात हजर केले असता 9 मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.सहायक निरीक्षक अजय गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक भीमा लोंढे, दीपक साबळे यांनी साजीद मंडल, आकाश गोफणे, प्रशांत मुळे यांचा शोध घेऊन अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय वाघमारे व पोलीस नाईक राजु ढोरे करीत आहेत.